Tarun Bharat

जुन्या पेन्शनसाठी घुमला आवाज

पालिकेत शटर डाऊन अन् आतमध्ये काम सुरू ; जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त सातजण

प्रतिनिधी/ सातारा

राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक देताच सातारा शहरासह जिह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून जोरदार निदर्शने मंगळवारी सकाळी केली. सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही शटर डाऊन केले होते अन् काम मात्र आत सुरूच होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आणि मोर्चा काढला. जिल्हा परिषदेत सर्व अधिकारी वर्ग त्यांच्या केबीनमध्ये उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात अवघे सातजण उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मात्र, वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळी निदर्शने सु रू होती.

जुनी पेन्शन, एकच मिशन अशा टोप्या घालून कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच दोन्ही शटर खाली ओढून संपात सहभाग असल्याच्या पत्रकावर सही कऊनच आतमध्ये सोडले जात होते. प्रवेशद्वाराबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यामध्ये रिपब्लिकन एम्प्लाईज फेडरेशन, लाल बावटा युनियन यासह कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. तेथून पालिकेचे काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य आतील गेटबाहेर जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आदी सर्व संघटनांनी उपस्थिती लावत जोरदार निदर्शने केली. तेथून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वच विभागातील कर्मचारी जमले होते. त्यात शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, सहकार विभागातील कर्मचारी असे सर्व सरकारी कर्मचारी जमून वेगवेगळे त्यांची निदर्शने करत होते. शिष्टमंडळांनी जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात अवघे सातच जण

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपाच्या दिवशी अवघे सात जण हजर होते. स्वत: जिल्हाधिकारी ऊचेश जयवंशी यांचे केबीन बंद होते. त्यांचे दोन्ही स्वीय्य सहाय्यकापैकी रंजना नवाळे या उपस्थित होत्या. आपत्ती व्यवस्थापनचे देवीदास ताम्हाणे हेही होते. आस्थापना विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख या त्यांच्या मैत्रीणीशी गप्पा मारत बसल्या होत्या. तसेच महेश उबारे हे कामात मग्न होते. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या पदाचा तुर्तास कारभार पहात असलेले मनोज आवटे आणि त्यांच्या केबीनबाहेरील एक कर्मचारी एवढेच कामावर दिसत होते. मनोज आवटे हे तर मोजक्याच लोकांना भेट देत होते. पुरवठा विभागात स्द्धा एकच कोणीतरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या केबीनमध्ये बसल्याचे दिसत होते. पुनर्वसन कार्यालयात चार महिला कर्मंचारी होत्या. त्याही कंत्राटी कर्मचारी दिसत होत्या.

Related Stories

नगरपालिकेच्या निवडणूका राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार

Patil_p

साताऱयात 500 मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान

Patil_p

मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस

datta jadhav

कोल्हापूर जिल्हय़ात 2 बळी, 35 पॉझिटिव्ह

Archana Banage

सातारा तालुक्यात निवडणुकीचे अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी

datta jadhav

सातारा : अन्यथा पालिकेसमोर आंदोलन छेडू

Archana Banage