Tarun Bharat

अमेरिकेत शिख विद्यार्थ्याला कृपाण बाळगता येणार

अमेरिकेच्या विद्यापीठाने बदलले धोरण

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेत शिकत असलेले शीख विद्यार्थी आता शैक्षणिक संस्थांमध्ये कृपाण (धर्माचे चिन्ह) बाळगू शकणार आहेत. विद्यापीठाने स्वतःच्या वेपन्स ऑन कँपस धोरणात दुरुस्ती केली आहे. दोन महिन्यांपूर्वी एका शीख विद्यार्थ्याला झालेल्या अटकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात एक शीख विद्यार्थी कृपाणसोबत पोहोचला होता, तेथे त्याला सिरी साहिब उतरविण्यास सांगण्यात आले होते, परंतु याला नकार दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती.

द शिख कोएलिशन आणि ग्लोबल शिख कौन्सिल समवेत अनेक शीख नेत्यांसोबत चर्चा केल्यावर जुन्या धोरणात बदल केल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. कृपाण बाळगणाऱया विद्यार्थ्याच्या अटकेसाठी आम्ही माफी मागतो. नव्या धोरणातील निर्णय त्वरित लागू करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु शेरोन एल गॅबर आणि चीफ डायव्हर्सिटी ऑफिसर ब्रँडन एल. वोल्फ यांनी सांगितले आहे.

Related Stories

पूजास्थान कायद्यासंबंधी सुनावणीत केंद्र सरकारला वाढीव कालावधी

Patil_p

राजस्थानमधील 8 शहरांमध्ये आजपासून ‘नाईट कर्फ्यू’

Tousif Mujawar

कोरोना : देशातील ‘या’ सहा राज्यांत सर्वात जास्त मृत्यू : लव अग्रवाल

Tousif Mujawar

आठवडय़ाचा समारोप पुन्हा तेजीसोबत

Patil_p

अवध विभागात भाजपची सुरक्षित चाल

Patil_p

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p