Tarun Bharat

किरकोळ महागाई दरात काहीशी घट

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जुलै महिन्यात किरकोळ महागाई दरात काही प्रमाणात घट झाली आहे. या महिन्यात महागाई दर 6.71 टक्के राहिला. जूनमध्ये हाच दर 7.01 टक्के होता. महागाई दर 7 टक्क्मयांपेक्षा कमी राहण्याची जानेवारीपासूनची ही दुसरी वेळ आहे. जुलै 2021 मध्ये किरकोळ महागाई दर 5.59 टक्के इतका होता. ग्राहक मूल्य सूचकांक आधारित चलनवाढीचा दर अद्यापही समाधानकारक स्थिती असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने केलेला आहे. विशिष्ट जागतिक परिस्थिती पाहता यंदाच्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 5.75 ते 6 टक्क्मयांपर्यंत सरासरी राहू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये महागाई दरात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. जुलैमध्ये अपेक्षेप्रमाणे तो कमी झाला आहे.

मार्चपर्यंत किरकोळ महागाई दर 5 टक्क्मयांच्या पातळीपर्यंत येईल. पुढच्या आर्थिक वर्षात त्यात 2 टक्के घट होईल, असा निष्कर्ष स्टेट बँकेच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. गेले सलग सहा महिने किरकोळ महागाई दर 6 टक्के ते त्यापेक्षा जास्त अशा पातळीवर आहे. गेल्या तीन महिन्यात महागाई दरवाढ रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपोदरात वाढ केलेली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपातही केलेली आहे. याचा संयुक्त परिणाम म्हणून महागाई दरात कपात झालेली दिसून येईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

औद्योगिक उत्पादनात वाढ

जून महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात 12.3 टक्क्मयांची वाढ दिसून आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. जून 2021 मध्ये उत्पादन वाढीचा दर 13.8 टक्के होता. यंदा त्यात काहीशी घट झालेली असली तरी एकंदर अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचे हे चिन्ह आहे, असा दावा करण्यात आला.

निर्यात 36.27 अब्ज डॉलर्स

जुलैमध्ये निर्यातीत 2.14 टक्के वाढ होऊन ती 36.27 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. व्यापारी तूटही 30 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वार्षिक तुलना करता जुलैमध्ये गेल्या जुलैच्या तुलनेत निर्यातीत 43.61 टक्के वाढ दिसून आली आहे. व्यापारी तूट जुलै 2021 मध्ये 10.63 अब्ज डॉलर्स होती. या तुटीत मात्र मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.

Related Stories

महाकाय शार्क माशाचे प्राण वाचवण्यात यश

Amit Kulkarni

पंतप्रधान मोदींच्या आधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश

prashant_c

बिहार : कोरोना बाधितांचा आकडा 2 लाख 62 हजार 628 वर

Rohan_P

डॉक्टरांसोबत गैरवर्तन आता दयायाचना

Patil_p

लॉकडाउनमध्ये 39 पत्नींना सांभाळण्याचे दिव्य

Patil_p

बकरी ईद : केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!