Tarun Bharat

पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ

इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर, लाल मिरची आवकेत वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र शनिवारी पुन्हा पालेभाज्यांची आवक काहीशी कमी झाली होती. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली होती. विशेषत: मेथी, लालभाजी, पालक, कोथिंबीर आदींच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 20 रुपयाला चार पेंड्या मिळणारी मेथी 10 रुपयाला एक पेंडी अशी विक्री सुरू होती. इतर भाजीपाल्यांचे दर कमी होते.

शनिवारच्या आठवडी बाजारात भाज्यांचा प्रतिकिलो दर पुढीलप्रमाणे

ढबू 50 रु., काकडी 50 रु., गाजर 50 रु., बिन्स 60 रु., ओली मिरची 60 रु., वांगी 60 रु., टोमॅटो 15 रु., भेंडी 60 रु., गवार 80 रु., हिरवा वाटाणा 60 रु., कारली 50 रु., कोबी नग 10 रु., फ्लॉवर नग 10 रु., पेंडीचा दर मेथी 10 रु.,  लालभाजी 10 रु., कोथिंबीर 10 रु., कांदापात 10 रुपयाला दोन पेंड्या, पालक 10 रु. दोन पेंड्या.

मागील पंधरा दिवसांपासून भाजीपाल्यांचा दरात घसरण सुरू झाली आहे. मात्र शनिवारच्या बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. त्यामुळे पालेभाज्यांचे दर काहीसे वाढले होते. मात्र इतर भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. स्थानिक भाजीपाला उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला आवक वाढत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.

लाल मिरचीची आवक

बाजारात लाल मिरचीची आवक वाढू लागली आहे. वर्षभराचे तिखट करण्यासाठी गृहिणींकडून मागणीदेखील वाढू लागली आहे. मात्र लाल मिरचीचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे लाल मिरची खरेदी करणाऱ्या महिलांना आर्थिक चटका सहन करावा लागत आहे.

Related Stories

लोकमान्य ग्रंथालयात अक्षरछाया दिवाळी अंकाचे प्रकाशन

Omkar B

केएसआरटीसी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

Patil_p

ज्योती मिरजकर यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार

Tousif Mujawar

दहावीचा निकाल उद्या

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुकला महिलास्नेही पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Omkar B