स्वतःचा ध्वज अन् पासपोर्ट देखील
चिली पेटागोनियानजीक वितळणाऱया हिमखंडांच्या विशाल विस्तारादरम्यान एक छोटा देश असल्याचे तुम्ही जाणता का? 8 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी 5 मार्च 2014 रोजी ग्रीनपीसने चिलीच्या कायद्यातील एका त्रुटीचा वापर करत 8,800 मैलाच्या हिमखंडाने व्यापलेली भूमी आमचा स्वतंत्र देश असल्याचे घोषित केले होते. तसेच याचे नाव ग्लेशियर रिपब्लिक ठेवण्यात आले असून याला मायक्रोनेशन म्हणून ओळखले जात आहे.
खरोखरच एक देश ठरण्यासाठी काही आवश्यकता असून त्यांची पूर्तता ग्रीनपीसच्या सौजन्याने ग्लेशियर रिपब्लिकला करण्यात आली आहे. यात एक ध्वज आणि स्वातंत्र्याच्या घेषणेसह 40 आंतरराष्ट्रीय दूतावास आहेत.
ग्लेशियर रिपब्लिकच्या ध्वजात तीन शिखरे दर्शविण्यात आली आहेत. ग्लेशियर रिपब्लिकची राजधानी एका अज्ञात ठिकाणी तंबूच्या स्वरुपत आहे. ग्रीनपीस अधिकृतपणे ग्लेशियर रिपब्लिक पासपोर्टही जारी करत आहे. तसेच लवकरच एक फुटबॉल टीमची सुरुवात केली जाणार आहे. येथील लोकसंख्या 1 लागा 65 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण एवढय़ा संख्येतील लोकांनी यासंबंधीच्या अर्जावर स्वाक्षरी केली आहे. तेथे लोकांचे विवाह देखील झाले आहेत.
मायक्रोनेशन म्हणून मान्यता मिळण्यासाठी उपाययोजना करूनही ग्लेशियर रिपब्लिकला संयुक्त राष्ट्रसंघाकडून अद्याप स्वीकारण्यात आलेले नाही. यामुळे याला एक वैध, स्वतंत्र देश म्हणून ओळखले जात नाही. चिली आणि अर्जेंटिनादरम्यान एका भागाला रिकामी पाहून ग्रीनपीसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला देश घोषित केले. कायदेशीर त्रुटींमुळे हे ठिकाण आम्ही वसविले असून आता हे मायक्रोनेशन असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.