Tarun Bharat

पुण्यात ATS ची मोठी कारवाई; लष्कर-ए- तोयबासाठी काम करणाऱ्या तरुणाला 3 जूनपर्यंत कोठडी

ऑनलाईन टीम / तरुण भारत :   

काश्मीरमधील दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तरुणाला पुणे दहशतवादी विरोधी पथकाने दापोली परिसरातून अटक केली आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले असता 3 जूनपर्यंत ATS कोठडी सुनावण्यात आली.

जुनेद मोहम्मद (वय 18) असे या तरुणाचे नाव आहे. तो बेरोजगार असून, मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. मागील दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झालेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. महिनाभरापूर्वीच या संघटनेने तरुणाच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याच्या आज मुसक्या आवळण्यात ATS ला यश आले.  

या तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या अधिक तपासासाठी ATS ने न्यायालयात कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने जुनेद मोहम्मदला 3 जूनपर्यंत ATS कोठडी सुनावली आहे.

जुनेदला जम्मू-काश्मीरमधून पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. कोर्टाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुनेदकडे वकिल नव्हता म्हणून कोर्टाने त्याला अॅड. यशपाल पुरोहित हे वकिल दिले होते.

अॅड. यशपाल पुरोहित यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की, , व्हाॅट्सअप आणि फेसबुकवरून लष्कर-ए- तोयबासाठी जुनेद तरूणांची भरती करायचा आणि त्यासाठी तो फंडिग गोळा करायचा. तसेच तो महाराष्ट्रातील ठिक-ठिकाणांचा पाहणी करायचा. दहशतवादी हल्ला कोठे घडवून आणायचा याची प्रामुख्याने त्याच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. जुनेद हा मदरसा तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. त्याने महाराष्ट्रातील अनेक भाग पालथा घातला आहे. तो नक्की कोठे राहत होता याची तपासणी पथक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श; तर गडकरी, पवार आताचे आयडॉल – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Archana Banage

गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी?

datta jadhav

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही कोरोना काळात 50 लाखांचे विमा संरक्षण : अजित पवार

Tousif Mujawar

गांजा विकताना सांगली-सोलापूर जिह्यातील त्रिकुटाला अटक

Tousif Mujawar

घरी परतत असलेल्या मजुरांच्या तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

Tousif Mujawar

ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतिक : डॉ.रामचंद्र देखणे

Tousif Mujawar