Tarun Bharat

भरधाव कारची थांबलेल्या कारला धडक

Advertisements

अपघाताची दृष्ये सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी /बेळगाव

भरधाव कारने रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेली कार व दुचाकीला ठोकरल्याची घटना महात्मा फुले रोड परिसरात घडली असून अपघाताची दृष्ये सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहेत.

लाल रंगाची एक कार सुसाट वेगाने येते. वेगामुळे कार भररस्त्यावर आडवी होते. त्यानंतर रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेली कार व दुचाकीला धडक देते. कारच्या ठोकरीमुळे पांढरी कार चालकाविनाच पुढे सरकू लागते. त्यानंतर त्या कारला अडविण्यासाठी नागरिक त्या दिशेने धाव घेतात.

यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अपघात घडल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजवरून या अपघाताची माहिती सामोरी आली आहे. मात्र सुदैवाने कोणालाच इजा पोहोचली नाही. यासंबंधी एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

बॅन्डेड रोडचा भाव चढताच…

Patil_p

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करा

Omkar B

खानापूर-जांबोटी क्रॉसजवळील खोकीधारकांना नोटिसा

Patil_p

वडगाव दत्त मंदिर येथे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

मिरज येथील कवी संमेलनात बेळगावच्या कवींचा सहभाग

Patil_p

नेहरुनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!