A speeding cargo tractor overturned at Nirwade
भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास निरवडे कौल कारखाना परिसरात घडला. दरम्यान या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. असून त्याला अधिक उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका सहकाऱ्याला सुदैवाने कोणती दुखापत झाली नाही मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबधित ट्रॅक्टर शिरोड्याच्या दिशेने जात होता यावेळी चालकाचा ताबा तुटल्यामुळे तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ओहळात कलंडला या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली दरम्यान परिसरात जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला मदतकार्य करत तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तर त्याच्यासोबत असलेल्या अनेक सहकारी सुदैवाने बचावला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
न्हावेली / वार्ताहर