बिहारमधील एकाचा मृत्यू, छठ पूजेनिमित्त विशेष टेनसाठी गर्दी
वृत्तसंस्था/ सुरत
दिवाळी आणि छठ सणानिमित्त बिहारला जाणाऱ्या विशेष टेनमध्ये चढताना शनिवारी गुजरातमधील सुरत रेल्वेस्थानकावर झालेल्या गोंधळामुळे एका 40 वषीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत झालेला प्रवाशी बिहारमधील असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
सुरत रेल्वेस्थानकावर ताप्ती गंगा एक्स्प्रेस टेनमध्ये चढण्यासाठी शनिवारी सकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी यांनी दिली. प्रवाशांच्या गर्दीमुळे स्थानक आवारात झालेल्या चेंगराचेंगरीत काही लोक बेशुद्ध झाले. रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे काही प्रवाशांना चक्कर आल्यासारखे वाटले, असे त्यांनी सांगितले. अत्यवस्थ झालेल्या प्रवाशांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्रातून बिहार, उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष ट्रेनसाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे.