बेळगाव प्रतिनिधी- हेळवी समाज अत्यंत मागासलेला समाज आहे. भटक्या विमुक्त जातींमध्ये त्यांचा समावेश होतो. उदरनिर्वाहासाठी हा समाज भटकंती करतो, या समाजाकडे सरकारचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा सरकारने या समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, यासाठी केंद्र सरकारकडे याबाबत अहवाल पाठवून द्यावा या मागणीसाठी हेळवी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समाजाचे राज्याध्यक्ष नागराज गुरुजी, बेळगाव जिल्हाध्यक्ष सदाशिव हेळवार, अमृत दप्पीन्नावर,शिवशरण हेळवार, शंकर स्वामीजी, काळप्पा हेळवार, आप्पासाहेब हेळवार, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleइस्लामपुरात विहिरीत पाय घसरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू
Next Article दोन मुलीच झाल्याने विहिरीत ढकलून पतीकडून पत्नीचा खून