Tarun Bharat

मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल गुन्हेगार अटकेत

पुलाची शिरोली/वार्ताहर

मोबाईल चोरी प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक केली. किशन उर्फ बोबड्या उमाशंकर (कुंभारभाटी रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १३ मोबाईल व एक मोपेड असा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर मुल्ला, सहायक फौजदार अविनाश पवार व नजीर शेख यांनी ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरोली औद्योगिक वसाहती मधील टोप गावच्या हद्दीतील बालभारती समोर असणाऱ्या चाळीतून परप्रांतीय मजुरांचे तीन मोबाईल सोमवारी दिनांक १९ सप्टेंबर चोरीस गेले होते. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सुरु असताना पोलिसांच्या गोपनीय विभागाला शिरोलीत कोणीतरी मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्याचवेळी किशन उर्फ बोबड्या हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सांगली फाटा येथे मोपेड वरून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी मोपेडची डिग्गी तपासली असता त्यामध्ये तीन स्मार्ट फोन मोबाईल मिळाले. हे मोबाईल बालभारती समोरून चोरी केली असल्याची माहिती बोबड्याने पोलिसांना दिली. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचे आणखीन दहा स्मार्ट फोन मोबाईल मिळाले. याची अंदाजे किंमत ६५ हजार रुपये असून पोलिसांनी त्याची मोपेडही जप्त केली.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत

Related Stories

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलीसांना दिसली नाही का? : इंगवले

Archana Banage

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकरी ऑक्सिजनवर

Archana Banage

शिवाजी विद्यापीठातील लेखणी बंद आंदोलन तात्पुरते स्थगित

Archana Banage

डॉ. सुनीलकुमार लवटे सत्कार समितीची सामाजिक बांधिलकी

Archana Banage

शिरोळात मुस्लिम समाज आक्रमक; नुपुर शर्मावर कारवाईची मागणी

Abhijeet Khandekar

सैन्यभरतीचे वेळापत्रक बदले; ‘या’ जिल्ह्यात सुधारीत वेळापत्रकानुसार होणार भरती

Archana Banage