Tarun Bharat

फांद्यांच्या विळख्यात अडकले पथदीप

कंत्राटदाराच्या अजब कारभाराबद्दल आश्चर्य

बेळगाव / प्रतिनिधी

शहरातील विविध रस्त्यांवर पथदीप बसविण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणचे पथदीप बंद असल्याने रस्त्यांवर अंधार पसरलेला आहे. काही ठिकाणी नव्याने पथदीप बसविण्यात आले असून झाडांच्या फांद्यांमुळे पथदीपांचा प्रकाश रस्त्यांवर पडत नाही. त्यामुळे पथदीप कंत्राटदाराच्या अजब कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांवर पथदीप बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी पथदीप बसविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी बसविण्यात आलेले पथदीप नादुरुस्त झाले आहेत. पथदीपांची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर अंधार पसरला आहे. काही ठिकाणी नवीन पथदीप बसविताना झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या नाहीत. झाडांच्या मध्ये पथदीपांची उभारणी करण्यात आल्याने दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. किमान पथदीप बसविणाऱया कंत्राटदारांना याबाबतची कल्पना येणे आवश्यक आहे. पण केवळ पथदीप उभारणे इतकाच हेतू ठेवून ही कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

महापालिका मुख्य कार्यालयाकडे जाणाऱया एस. पी. ऑफीस रोडवरील काही पथदीप झाडांच्या फांद्यांमध्ये झाकोळले आहेत. पथदीपांची देखभाल महापालिकेकडून केली जाते. मात्र, या कार्यालयाकडे जाणाऱया रस्त्यावरच पथदीप झाडांच्या आडोशाला उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. कंत्राटदाराच्या अजब कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे क्लब रोडवरही अशीच परिस्थिती असून, झाडांमुळे पथदीपांचा प्रकाश रस्त्यांवर पडत नाही. गांधी चौक ते विश्वेश्वरय्या नगरपर्यंतच्या रस्त्यांवरील निम्मे पथदीप बंद आहेत. सुरू असलेले दिवे झाडांच्या फांद्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे हा रस्ता अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. शासनाच्या अजब कारभाराबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शनसाठी जोरदार निदर्शने

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट रुग्णालयाची अध्यक्षांकडून पाहणी

Amit Kulkarni

तालुक्यात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्रीचा जागर

Amit Kulkarni

खानापूर नगरपंचायतीच्या बेजबाबदारपणाचा कळस

Amit Kulkarni

फिशमार्केट गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेवेळी गोंधळ

Patil_p

परीक्षा घोटाळाः ज्युनिअर लाईनमनला अटक

Patil_p