Tarun Bharat

कंत्राटी सफाई कर्मचाऱयांचे 1 जुलैपासून कामबंद आंदोलन

Advertisements

बैठकीत घेतला निर्णय : कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची कर्मचाऱयांची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शहर स्वच्छता करण्याचे काम करत आहे. केवळ बेळगावमधीलच नाही तर राज्यातील 30 हून अधिक जिल्हय़ातील कर्मचारी हे काम करत आहेत. मात्र अद्याप नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतले नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असून आता 1 जुलैपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय स्वच्छता कर्मचाऱयांनी बैठकीत घेतला आहे.

काळी आमराई येथील समाज मंदिरामध्ये स्वच्छता कर्मचाऱयांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विजय निरगट्टी होते. यावेळी कर्मचाऱयांनी कोणत्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आमचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. कंत्राटदार मनमानीपणे पगार देत आहेत. बऱयाचवेळा दोन ते तीन महिने पगारच दिला जात नाही. पहाटे उठायचे काम करायचे. मात्र सुविधा दिल्या जात नाहीत. शहर स्वच्छ करण्याचे काम करत आहे. त्यामुळे याचा कोठे तरी विचार प्रत्येक जिल्हय़ाच्या प्रशासनाने करण्याची गरज निर्माण असल्याचे मत अनेक स्वच्छता कर्मचाऱयांनी व्यक्त केले.

सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे आता काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय या कर्मचाऱयांनी घेतला आहे. बैठकीला सफाई कर्मचारी समितीचे अध्यक्ष दीपक वाघेला, शन्मुख आदीआंद्र, मालती सक्सेना, बळ्ळारी, मुनीस्वामी भंडारी आदी उपस्थित होते.

Related Stories

संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

Amit Kulkarni

अधिवेशन काळात धरणे, रॅलींना परवानगी नाही

Amit Kulkarni

व्हीटीयूमध्ये उद्यापासून विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शन

Amit Kulkarni

बायपास विरोधात पुन्हा एल्गार

Amit Kulkarni

दीनदयाळ यांचे विचार अनुकरणीय

Patil_p

साईराज वॉरियर्सने पटकाविला दीपक नार्वेकर बीपीसी चषक

Patil_p
error: Content is protected !!