Tarun Bharat

तळाशील कवडा रॉकजवळ पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ

A swarm of Perscene trawlers near Kavada Rock on the bottom

तळाशीलसमोरील कवडा रॉकजवळ साडेबारा वावाच्या आत येऊन शनिवारी सायंकाळी पर्ससीन ट्रॉलर्स बेकायदेशीरपणे मासेमारी करीत होते. नियमबाह्य मासेमारी करणाऱ्या या ट्रॉलर्सना पकडण्यासाठी मच्छीमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क केला असता मत्स्य विभागाची गस्ती नौका गस्त घालून दुपारी उशिरा मालवण बंदरात परतल्याचे स्पष्ट झाले. शिवाय मच्छीमारांच्या मागणीनुसार तातडीने गस्ती नौका घेऊन तळाशीलच्या दिशेने जाण्यासाठी कुणी जबाबदार अधिकारीही कार्यालयात उपस्थित नव्हता. त्यामुळे दिवसभराची गस्त आटोपून गस्ती नौका मालवणात परतल्याचे पाहूनच पर्ससीन नौकांनी पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात घुसखोरी केल्याचे पुन्हा सिद्ध झाले. बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या माशांना समाधानकारक भाव मिळत नसल्याचे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

नऊ लाखांहून अधिक दंड वसूल

NIKHIL_N

Kolhapur; युपीएससी परीक्षेत कोल्हापुरचा झेंडा

Kalyani Amanagi

कर्नाटकात गेल्या २४ तासात ७ लाखाहून अधिक जणांचे लसीकरण

Archana Banage

महात्मा गांधींनंतर भारतीयांना समजून घेणारा एकच नेता नरेंद्र मोदी; राजनाथ सिंह

Archana Banage

कुडाळ : भातशेतीच्या पंचनाम्यांचा आढावा

NIKHIL_N

साखर उद्योगाला पॅकेज देण्यापेक्षा साखरेला चांगला दर द्या- वैभव नायकवडी

Archana Banage