Tarun Bharat

हिरेबागेवाडीजवळ अपघातात शिक्षक जागीच ठार

Advertisements

दुचाकीला ठोकरून ट्रक कलंडला : पत्नी जखमी

प्रतिनिधी /बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी आयबीजवळ आयशर ट्रक दुचाकीला ठोकरून पलटी झाला. या अपघातात हिरेबागेवाडी येथील एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी जखमी झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

रुद्राप्पा चिन्नाप्पा गिऱयाण्णावर (वय 55) रा. हिरेबागेवाडी असे त्या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी शशिकला या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. रात्री हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

बेळगावहून हिरेबागेवाडीकडे जाणाऱया आयशर ट्रकची दुचाकीला धडक बसून हा अपघात घडला. शुक्रवारी पावसामुळे शाळांना सुटी असल्याने रुद्राप्पा हे आपल्या पत्नीसमवेत दुचाकीवरून बेळगावला गेले होते. खरेदी संपवून हिरेबागेवाडीला परतताना हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने तेथून पलायन केले. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील इमारतीचे काम पूर्ण

Amit Kulkarni

पर्वरीत कारला आग लागून जळून खाक

Patil_p

फुटपाथवर ठाण मांडलेल्या फळविक्रेत्यांना हटविले

Patil_p

नव्याने आधारकार्ड काढणे, दुरुस्ती करण्यासाठी धावपळ सुरुच

Patil_p

अर्ध्या वेतनावर किती दिवस काम करू?

Amit Kulkarni

कारच्या ठोकरीने सदाशिवनगर येथील तरुण ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!