Tarun Bharat

प्रेमिकांना संरक्षण देणारे मंदिर

Advertisements

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्हय़ात अनेक धार्मिक स्थळे आहेत. मात्र, त्यापैकी एक मंदिर असे आहे की जिथे प्रेमी युगुलांना संरक्षण दिले जाते. हे मंदिर शंगचुल महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. ते कुल्लू जिल्हय़ाच्या शांगड या गावात आहे. या मंदिरात प्रवेश करणाऱया प्रेमी युगुलांचे संरक्षण साक्षात महादेव करतात, अशी समजूत आहे. या मंदिरात पोलिसांनाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे प्रेमी युगुलांना कोणाचीही भीती बाळगण्याचे कारण नसते. सर्वसाधारणपणे आजही प्रेमात पडलेल्या तरुण, तरुणींना जर घरच्यांचा विरोध असेल तर घरात आश्रय मिळणे शक्य नसते. अशा स्थितीत त्यांना कायद्याचा आधार शोधावा लागतो.

मात्र, या मंदिरात त्यांना तशा प्रकारचा धार्मिक आश्रय दिला जातो. या मंदिराचा संबंध थेट महाभारत काळाशी जोडला गेला आहे. या मंदिराच्या परिसराचे क्षेत्रफळ जवळपास 30 एकर आहे. एकदा या परिसरात प्रवेश केला की प्रेमी युगुलांना कोणीही विरोध करू शकत नाही. तसेच त्यांना त्रासही दिला जाऊ शकत नाही. या मंदिरात वनवासातील पांडवांनी काही काळ आश्रय घेतला होता, अशीही समजूत आहे. पांडव येथे आश्रय घेत असताना कौरवही येथे त्यांचा पाठलाग करत पोहोचले होते. तथापि शंगचुल महादेवाने कौरवांना रोखले आणि मंदिर परिसरात त्यांना येऊ दिले नाही. महादेवाच्या भयाने कौरवांना परत जावे लागले. त्यामुळे पांडवांचा वनवास सुरळीत पार पडला, अशीही कथा सांगितली जाते.

प्रेमी युगुलांना संरक्षण देणारे हे भारतातील एकमेव धर्मस्थान असावे, असे मानले जाते. त्यामुळे येथे नेहमी अशा लोकांची गर्दी असते यात काही आश्चर्य नाही. त्यांचे संरक्षण प्रत्यक्ष मंदिरांच्या पुजाऱ्यांकडूनच केले जाते. त्यामुळे कोणीही त्यांना हात लाऊ शकत नाही. त्यांना विरोध करणाऱ्यांची काही ना काही हानी होते, अशीही समजूत रूढ झालेली आहे. परिणामी कोणी तसेच धाडसही करत नाहीत. त्यामुळे हे एक त्यांच्यासाठी सुरक्षित स्थान असल्यास नवल नाही.

Related Stories

‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

datta jadhav

सप 10 मार्चला समाप्तवादी पक्ष ठरणार

Patil_p

‘पीएम किसान’ची रक्कम दुप्पट?

Patil_p

पुनर्लसीकरणाचा आदेश देण्यास नकार

Patil_p

दिल्लीत पारा 45 अंशांच्या पार

Patil_p

‘ई-रुपी’ डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!