रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथे अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आल़ा राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून गुरूवारी ही कारवाई करण्यात आल़ी टेम्पोमध्ये 110 विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आल़े तर या पकरणी टेम्पोचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल़ा
स्वप्नील चंद्रकांत कांबळे (26, ऱा कागल ज़ि कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आह़े गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी ग्रामीण विभागामार्पत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत होत़ी 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 या सुमारास सफेद रंगाचा टेम्पो (एमएच 09 इएम 8207) संशयास्पदरित्या आढळल़ा या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचे 110 बॉक्स अवैधरितीने वाहतूक करताना आढळल़े या 110 बॉक्समध्ये मॅकडाŸल नंबर 1 गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 75 बॉक्स, इंम्पेरियल ब्लू गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 25 बॉक्स, रॉयल स्टॅग गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 10 बॉक्स आदींचा समावेश आह़े उत्पादन शुल्क विभागाकडून 2 मोबाईल, 110 मद्याचे बॉक्स व टेम्पोसह एकूण 13 लाख 44 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पकरणी वाहनचालकावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील कलम 65 (अ), (ई), 81, 83 ,90 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यात अजूनही काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्तवण्यात आली आह़े गुह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक एस. ए. भगत हे करीत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाचे अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण विभागाचे निरीक्षक बापूसाहेब डोणे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, जवान अर्शद न. शेख, दत्तप्रसाद सु. कालेलकर यांनी केली.