Tarun Bharat

बसपाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड

Advertisements

अखेरच्या दिवशी गर्दी, मुदतीत वाढ

प्रतिनिधी / बेळगाव

गुरुवारी बसपास प्रक्रियेचा अखेरचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी बसपास विभागात विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. दरम्यान परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी तातडीने दाखल घेऊन सर्वांना बसपास उपलब्ध होतील. शिवाय बसपासच्या मुदतीत देखील वाढ करण्यात आली आहे, असे सांगितले.

शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रक्रियेला प्रारंभ होतो. यंदा शाळांना वेळेत प्रारंभ झाला. त्यापाठोपाठ बसपास प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मागील महिन्याभरापासून बसपासचे काम सुरु आहे. मात्र विद्यार्थ्यांनी बसपास मिळविण्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे बसपास घेणाऱयाची संख्या कमी झाली होती. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने 30 जूनपर्यंत बसपासची मुदत वाढवून दिली होती. मात्र या कालावधीत विद्यार्थ्यांनी बसपास काढून घेतले नाहीत. अखेर शेवटच्या दिवशी बसपास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.

मागील दोन वर्षात बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ असल्याने बसपास उपलब्ध व्हायला उशीर होत आहे. अखेरच्या दिवशी अर्ज देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने गर्दी झाली होती. दरम्यान परिवहनने पुढील आठवडाभर मुदत वाढवून दिली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना बसपास काढणे सोयीस्कर होणार आहे.

बसपाससाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविल्याने शेवटच्या दिवशी गर्दी वाढली होती. त्यामुळे आठवडाभर मुदत वाढवून देण्यात आली आहे. या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी बसपास काढून घ्यावेत.

– पी. वाय. नायक (विभागीय नियंत्रण अधिकारी)

Related Stories

ट्रक रस्त्यावर, चालक संपावर!

Amit Kulkarni

चाक गेले पुढे पुढे… बस पाठीमागे

Amit Kulkarni

डेकोरेटिव्ह खांबावरील दिवे मोडकळीस

Amit Kulkarni

कार पुलावरून कोसळून बेळगावचे तिघे गंभीर जखमी

Amit Kulkarni

निपाणीत डॉल्बीचा दणदणाट, प्रशासन हतबल

Amit Kulkarni

डब्यात तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका

Omkar B
error: Content is protected !!