Tarun Bharat

ठाणे-डोंगुर्ली पंचायतीमधून एकूण 23 उमेदवार रिंगणात

दुरंगी तिरंगी, सप्तरंगी लढतीमुळे उत्क?ठा वाढवणार : तीन उमेदवार बिनविरोध

प्रतिनिधी /वाळपई

सतरी तालुक्मयातील पर्ये मतदार संघातील महत्त्वाचे समजले जाणाऱया ठाणे डोंगर्ली पंचायतीच्या एकूण 6 प्रभागातून 23 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

9 प्रभागापैकी तीन प्रभागातून उमेदवारांची निवड विरोध झालेली आहे. तर इतर सहा प्रभागांमध्ये 23 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. पैकी काही प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी तर काही प्रभागांमध्ये सप्तरंगी लढती होण्याची शक्मयता आहे. यामुळे येणाऱया काळात पंचायतीच्या माध्यमातून बऱयाच प्रमाणात रस्सीखेच पाहण्याची संधी मतदारांना प्राप्त होणार आहे.  ठाणे  पंचायत 9 प्रभागांची आहे. प्रभाग क्रमांक 2,6,9 हे महिलांसाठी आरक्षित घोषित केले होते. तर प्रभाग क्रमांक 1 हा मागासवर्गीयांसाठी आरक्षित घोषित करण्यात आला होता.

प्रभाग 1 मधून निलेश शांबा परवार यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभागातून एकूण तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी इतर दोघजणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निलेश परवाल यांची बिनविरोध निवड झाली. त्यांची ही निवड दुसऱयांदा बिनविरोध आहे. गेल्या पंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली होती.

प्रभाग क्रमांक 2 मधून सुधाकांत सावंत ,तनया गावकर व कोमल पालकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्मयता आहे. या प्रभागातून गेली पाच वर्षे उमेश सावंत यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे .यंदा मात्र हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध झाली नाही. एकूण प्राप्त झालेल्या माहितीनुसार तिघांमध्ये चांगल्या प्रकारची लढत होण्याची शक्मयता मतदारांनी व्यक्त केलेली आहे.

प्रभाग 3 मध्ये मात्र उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे .या प्रभागातून एकूण सात उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत .यामध्ये दशरथ गावकर व गजानन गावकऱ यांचा समावेश आहे. गेल्या वषी लता गावकर यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले होते. यंदा त्यांनी निवडणुकीतील माघार घेतल्यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

प्रभाग क्रमांक 4 मधून सरिता फटगो गावकर यांची दुसऱयांदा बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या पंचायत निवडणुकीमध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली होती. यंदा तिचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अन्य कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये तिरंगी लढत होणार आहे. मावळत्या पंचायत सभासद प्रजिता गावस यांच्या विरोधात विनायक गावस व नंदा गावस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सर्वच उमेदवारांना विजयाची चांगली संधी निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.

प्रभाग क्रमांक 6 महिलांसाठी आरक्षित आहे. यामुळे एकूण तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. दीपिका गावकर, रीना गावकर व अनुष्का गावस यांच्यामध्ये ही तिरंगी लढत होणार आहे.

गेली वीस वर्षे प्रभाग क्रमांक 7  चे नेतृत्व करणारे भाजपाचे कंदे कार्यकर्ते गोविंद कोरगावकर यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. यामुळे या ठिकाणी सुभाष चंद्रू गावडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. अन्य कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

 प्रभाग क्रमांक 8 मध्ये तिरंगी लढतीची अपेक्षा आहे. संचिता प्रेमकुमार गावकर, शाबा गावकर व गणपत गावकर यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची लढत होण्याची शक्मयता मतदारांनी व्यक्त केलेली आहे.

प्रभाग क्रमांक 9 या सूरला  येथील प्रभागांमध्ये तिरंगी लढतीची अपेक्षा आहे .गेल्या वषी सूर्यकांत गावकर यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले होते. त्यांना सरकारची नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी पंच सभासदात पदाचा राजीनामा दिला होता. आता नव्याने घेण्यात येणाऱया निवडणुकीमध्ये एकूण तिघांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्मयता असून यामध्ये अक्षदा गावकर सोनिया गावकर व रंजना गावस यांचा खास करून समावेश आहे.

Related Stories

सरकारच बनवतेय गुन्हेगारी राज्य

Amit Kulkarni

हरवळेत महिन्याभरात दुसरा युवक बुडाला

Amit Kulkarni

मोबाईल चोरटय़ाला अटक

Amit Kulkarni

कुचेली मैदान बचाव समितीतर्फे उपजिल्हाधिकारी कार्यालयाला धडक

Patil_p

कोरोनाचा 1 बळी तर 112 नवे रुग्ण

Patil_p

न्यायालयाच्या ईमारतीची मुख्यमंत्र्याकडून पाहणी

Patil_p