Tarun Bharat

कदंब पठारावर पर्यटकाला लुटले

तीन पर्यटन टॅक्सीचालकांना अटक : तिघेही लुटेरे बिगरगोमंतकीय

पणजी ; पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा ओल्ड गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन पर्यटक टॅक्सी कारसह तीन संशयितांच्या मुसक्या आवळून गजाआड करण्यात यश मिळविले आहे. संशयितांच्या विरोधात भादंसंच्या 394 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. याबाबत मोलेटी अप्पाराव (वय 47 वर्षे, आंध्र प्रदेश) यांनी शनिवारी ओल्ड गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये समीर मकबुल मुल्ला (26 वर्षे) हा संशयित मूळ कर्नाटक येथील असून सध्या तो इंदिरा नगर, चिंबल येथे राहत होता. इरफान शब्बीर भंडारी (30 वर्षे) हा संशयितही मूळ कर्नाटक येथील असून तोही इंदिरा नगर चिंबल येथे राहत होता. आसिफ जाफर शेख (39 वर्षे) हा संशयित मूळ झारखंड येथील असून तो रेडिशन बिल्डिंग, मणिपाल हॉस्पिटलजवळ, दोनापावला येथे राहत होता.

तिघेही लुटेरे बिगरगोमंतकीय

या गुन्ह्यातील हे तिघेही लुटेरे बिगरगोमंतकीय असून गोव्यातील गुन्हेगारी बिगरगोमंतकीयांमुळे वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून अर्टिगा कार क्रमांक जीए-07-एफ-5965, अर्टिगा कार क्र जीए-0-एफ-6410, व्हॅगन आर जीए-07 एफ-7074 या तीन पर्यटक टॅक्सी जप्त केल्या आहेत.

लुटून केली जबर मारहाण

गुऊवार 9 जानेवारी रोजी ही लुटीची घटना घडली होती. मोलेटी अप्पाराव हे पर्यटक कदंब पठार बायंगिणी ओल्ड गोवा येथून वास्को रेल्वे स्टेशनवर जाणार होते. संशयितांनी त्यांना टॅक्सीत घेतले आणि काही अंतरावर जाताच रस्त्यावर टॅक्सी थांबविली. त्यांना धमकाविण्यास सुऊवात केली. मारहाणही केली. त्यांच्याकडील रोख 45 हजार ऊपये हिसकावून घेतले. तिथूनच त्यांना हाकलून दिले आणि स्वत: पोबारा केला. मोलेटी अप्पाराव यांना काय करावे ते सूचत नव्हते. कसेबसे ते पुन्हा ज्या ठिकाणी राहिले होते त्या ठिकाणी गेले. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी 11 रोजी त्यांनी ओsल्ड गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ओल्ड गोवा पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले.

अट्टल चोरटा आसिफ मास्टरमाईंड

संशयित आसिफ जाफर शेख हा या प्रकरणातील मास्टरमाईंड असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याने पणजीत अशाच प्रकारचा गुन्हा केला होता. एका पर्यटकाकडील सोन्याचे दागिने लुटले होते. या प्रकरणात पणजी पोलिसांनी त्याला अटक केली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. राज्यात टॅक्सीमालक बिगरगोमंतकीयांना टॅक्सीचालक म्हणून कामावर ठेवतात. त्यांच्याबाबत संपूर्ण माहिती त्या मालकांना नसते. गुन्हेगारीची पाश्वभूमी असलेले लोक पर्यटकांची अशी लूट करतात आणि गोवा बदनाम होतो. गोव्यात टॅक्सीचालक पर्यटकांना लुटतात अशा बातम्या देशभरात पसरतात. वेळीच याच्यावर उपाययोजना केली नाही तर गोव्यातील टॅक्सी व्यवसाय मोडकळीस येणारच त्याच बरोबर पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होणार आहे. सरकारने याबाबत वेळीच ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

गोवा स्वातंत्र्यसैनिकांना वंदन, जनतेला शुभेच्छा!

Amit Kulkarni

युवा काँग्रेसने केले जीएमसीमध्ये अन्न पाकिटाचे वाटप

Amit Kulkarni

वास्कोतील चर्चच्या प्रांगणात रेलमार्ग दुपदरीकरणविरोधी सभा

Patil_p

सांगेचा प्रभाग 1 अनु. जमातींसाठी राखीव ठेवल्याने तीव्र नाराजी

Patil_p

पणजीच्या बकाल अवस्थेकडे लक्ष द्या : गिरीश चोडणकर

Patil_p

कोरोनाची झळ बसलेल्या गरिबांना अर्थसाह्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!