वाहतुकीला अडथळा, झाड हटविण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. टिळकवाडी, मंगळवार पेठमध्ये बुधवारी रात्री जुनाट झाड कोसळले. त्यामुळे मार्ग बंद झाला आहे. परिसरातील नागरिकांना नजीकच्या मार्गावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. झाड रस्त्याच्या मधोमधच कोसळल्याने येथील वाहतूकही ठप्प झाली आहे.
जोरदार पावसाने घरे, झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. मंगळवार पेठमध्ये कोसळलेल्या झाडामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी मार्ग बंद झाला होता. गुरुवारी दुपारीपर्यंत झाड हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. रस्त्याशेजारी असलेले जुनाट आणि आयुर्मान संपलेली झाडे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असतात. वनखात्याने अशा झाडांचा सर्व्हे करून वेळेत हटविणे आवश्यक आहे.
पाऊस-वाऱयामुळे झाडे कोसळण्याच्या प्रकारात वाढ
दरवषी पावसाळय़ात शेकडो झाडे कोसळतात. त्यामुळे शहरातील झाडांच्या संख्येत घट होत आहे. त्यामध्ये काही फळांची आणि फुलांचीदेखील असतात. तर काही निरुपयोगी असतात. एकीकडे वनखाते वृक्षारोपण करून झाडांची संख्या वाढवत आहे. तर दुसरीकडे पाऊस-वाऱयामुळे झाडे कोसळून पडत आहेत. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत घट होत आहे.