रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव येथे ज्वालाग्राही रसायनाने भरलेला टँकर उलटून मोठा अपघात झाला. हा टँकर मुंबईहून महाड येथील एमआयडीसीकडे रसायन घेऊन जात होता. हा अपघात दुपारी १२.३० च्या सुमारास घडला. दासगाव येथे हा रसायनाने भरलेला टँकर उलटल्याने भीतीचे वातावरण होते. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. महामार्गांच्या दोन्ही बाजूला २ किमी पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्वालाग्राही रसायन असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव टँकरवर पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते.