बकऱयांची मोठय़ा प्रमाणात विक्री : खरेदीसाठी बाजारात गर्दी
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यात गणेशचतुर्थी सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दुसरे दिवशी ऋषीपंचमी दिवशी तालुक्यात बकरी मारण्याची प्रथा असून शहरासह ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात ही परंपरा पाळली जाते. यासाठी रविवार बाजारचा दिवस असल्याने बकरी बाजारात मोठय़ा प्रमाणात बकऱयांची विक्री झाली. हलकर्णी येथील मऱयाम्मा मंदिरच्या समोरील मैदानात हा बकरी बाजार भरवण्यात आला होता. बाजारात चार ते पाच कोटीची उलाढाल झाल्याची चर्चा बकरी बाजारातील विक्रेत्यांनी बोलवून दाखविली. बकऱयांच्या किमतीही वाढल्या असून लहान बकरी 10 हजार तर मोठी बकरी 30 ते 35 हजारापर्यंत विक्री होत होती. बाजारात गर्दी पाहून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. जांबोटी क्रॉस ते हलकर्णीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा होत्या. त्यामुळे बेळगाव-खानापूर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसानी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. सकाळी 10 पासून सायंकाळी 6 पर्यंत या बकरी बाजारात व्यवहार होत होते. उंदरी तसेच पाचव्या दिवशी ओवसेनिमित्त ग्रामीण भागात बकरी मारण्याची परंपरा आहे. यासाठी हा शेवटचा बाजार असल्याने गर्दी झाली होती. तसेच श्रावण संपल्याने येथील मासळी मार्केटही सुरू झाले आहे. रविवारी गोवा व कारवार येथून मोठय़ा प्रमाणात मासळी दाखल झाली. मासळी बाजारातही रविवारी मोठी गर्दी दिसून येत होती.
रविवारी बाजारात तुडूंब गर्दी
खानापूर आठवडय़ाच्या रविवारच्या बाजारात गणपतीसाठी साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. शिवस्मारकापासून ज्ञानेश्वर मंदिर, बेंद्रे खुट्ट ते पारिश्वाड रोड या ठिकाणी बाजार मौठय़ा प्रमाणात भरला होता. भाजीपाल्यासह गणपतीला सजावटीच्या लागणाऱया वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणात होताना दिसत होती. रेडीमेड कापड दुकानेही गर्दीने फुलून गेली होती. आज सोमवारी व उद्या मंगळवारी बाजारात गर्दी होणार असल्याने पोलिसांनी बाजारपेठेत शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी व मंगळवारी दोन दिवस गणपतीला लागणाऱया माटोळीसह विविध साहित्य बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. जगंलातील विविध वनस्पती, वेली, फुले यासह इतर साहित्य खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून बेळगाव येथे विक्रीला जात असते.