Tarun Bharat

माजगाव येथे ईरटीका कारला टीव्हीएस वेगो दुचाकीची धडक

A TVS Vego two-wheeler collided with an Eertika car at Majgaon

दुचाकीस्वार गंभीर जखमी

ईरटीका कारला समोरून येणाऱ्या टीव्हीएस वेगो दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्यामुळे दूचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना माजगाव नाला येथे सकाळी ९ च्या सुमारास घडली. दुचाकी स्वराच्या पाठीमागे बसलेलला युवक किरकोळ जखमी झाला असून दोघांनाही उपचारासाठी माजगाव सरपंच दिनेश सावंत यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.


डोंबिवली येथील युवक ईरटीका कारने पर्यटनासाठी गोवा येथे जात होते. तर सावंतवाडी येथील जय अंबे स्वीट मार्टचे कर्मचारी माजगाव येथून टीव्हीएस व्हेगोने बेकरीचे पदार्थ घेऊन जात असताना हा अपघात घडला. टीव्हीएस व्हेगो चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती प्रचंड वेगाने ईरटीका कारवर आदळली.

त्यामुळे दुचाकीच्या दर्शनी भागाचा चंदामेंदा झाला. तर ईरटीका कारच्यासमोरील भागाचेही मोठे नुकसान झाले. ईरटीका कारला व्हेगोची धडक बसताच दुचाकीस्वार पाच फूट उंच उडून कारनंतर जमिनीवर आदळला. त्यामुळे डोक्याला व चेहऱ्याला मार बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर पाठीमागे बसलेल्या युवकाला किरकोळ दुखापत झाली.

ओटवणे प्रतिनिधी

Related Stories

रत्नागिरीत कोरोनाचा २९ वा बळी

Archana Banage

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ‘सनिटायझर टनेल’ची निर्मिती

Patil_p

पोलीस कर्मचारी बाबा गिरकर, गुरुप्रसाद परब यांना पदोन्नती

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात मुसळधार, खारेपाटणला पूर

NIKHIL_N

बेपत्ता तरुणाचा तिलारीत मृतदेह

NIKHIL_N

पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केल ‘कोव्हिड सेंटर’

Archana Banage