Tarun Bharat

Solapur; वागदरीजवळ चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

Advertisements

अक्कलकोट प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जवळील चौदामैल शिवारात चारचाकीच्या धडकेने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि १५ रोजी दुपारी घडली. सुभाष तात्याराव बबले (वय ५०) रा. किणी ता. अक्कलकोट असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि १५ रोजी मयत सुभाष तात्याराव बबले आपल्या गावातील चौघासोबत किणीहुन भुरीकवठे येथे ग्रामपंचायतीचे अंतर्गत गटार बांधकामाचे काम करण्यासाठी गेले होते. काम आटपून गावाकडे येत असताना वागदरी शिवारातील चौदा मैल जवळ आले असता समोरून पार्वती एचपी गॅस एजन्सीचे वाहनाने ( क्र एम एच १३ ए एन ४७२१ ) दुचाकीस जोरात धडक दिली. त्यामुळे मयत सुभाष तात्याराव बबले वय ५० व त्यांच्या सोबत पाठीमागे बसलेले लक्ष्मण ढबू जाधव वय ६० हे जखमी झाले. मयत सुभाष यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली होती.

Related Stories

कोव्हॅक्सिन लसीकरणासाठी योग्य जागा मिळेना

Abhijeet Shinde

जिल्हापरिषद शाळांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 मे पासून : शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची माहिती

Abhijeet Shinde

विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया – मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

कोल्हापूरसह सातारा, सांगलीत वन विभागाचे छापे

Abhijeet Shinde

नाभिक महामंडळाच्यावतीने काळ्या फिती लावून निषेध

Abhijeet Shinde

संजय हॉल येथे ५० बेडचे स्वतंत्र कोविड केंद्र सुरू करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!