Tarun Bharat

एक दुचाकी चोरटय़ाला अटक

Advertisements

चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त

प्रतिनिधी /पणजी

पणजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दुचाकी चोरटय़ाला अटक केली आहे. संशयितांकडून दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. संशयिताच्या विरोधात  गुन्हा नोंद केला असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालात हजर केले जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशय़िताचे नाव मुस्ताक शेख (20 थीवी अस्नोडा) असे आहे. संशयित मुळ कर्नाटक येथील असून तो गोव्यात राहत होता. सोमवारी सकाळी संशय़ित पणजी मार्केटमध्ये पार्क करून ठेवलेल्या दुचाकी हालवून पाहत होता. त्यावेळी लोकांनी त्याल पाहिले आणि पोलिसांना कळविले पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन संशय़िताला तब्यात घेतले त्याची कसून उलट तपासणी केली असता दोन दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. या पैकी एका दुचाकी चोरल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दाखल झाली आहे तर दुसरी डिचोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. हवालदार नितीन सावंत आणि सुजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

महापौर, उपमहापौर निवडणूक उद्या

Patil_p

‘पॉझिटिव्ह-निगेटिव्ह’चा गोंधळ

Omkar B

भाजप आणि संदीप वझरकर यांना पाठिंबा देणे चुकीचे होते- सुकूर पंच सदस्य डितोसा लोबो

Amit Kulkarni

आयडियल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Amit Kulkarni

उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती

Amit Kulkarni

वरूणापुरी ते मुरगाव बंदरपर्यंतचा चौपदरी महामार्ग गोवा मुक्ती दिनापर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री

Omkar B
error: Content is protected !!