Tarun Bharat

आरवलीत मायनिंग पूर्व सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा एकमुखाने विरोधाचा ठराव

Advertisements

A unanimous resolution of villagers against the pre-mining survey in Aravali

आरवली ग्रामपंचायतीच्या आरवली कार्य क्षेत्रामध्ये होणाऱ्या मायनिंग पूर्व सर्वेक्षणाला गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत एकमुखाने विरोध करण्यात आला. जिल्ह्यात एकमेव आरवलीत गावात सुरंगीची मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झाडे आहेत. यातून ग्रामस्थांना कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते. या गावात मायनिंग झाल्यास सुरंगी साठी प्रसिद्ध असलेल्या गावाची ओळख पुसली जाणार आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी मायनिंगला प्रकार पणे विरोध करण्याचा निर्धारही ग्रामसभेत करण्यात आला. सुरंगी शिवाय सुपारी, भातशेती.आंबा.नारळ.काजू उत्पादन करणारे ग्रामस्थ असुन मायनिंग झाल्यास त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येईल प्रदुषणामुळे आरोग्यावर परिणाम होवून विविध प्रकारचे आजार बळावतील तसेच वन्यजीव प्राणी लोकांची घरे जनावरांचे गोठे विहिरी यावर देखील परीणाम होईल.त्यामुळे आरवली ग्रामपंचायतने बोलावलेल्या खास ग्रामसभेमधे कंपनीला मायनिंगला कुठल्याही कामासाठी नाहरकत दाखला देवू नये, असे सर्वानुमते ठरवण्यात आले.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

रत्नागिरीत तारांगण आकार घेऊ लागले

Archana Banage

जिल्हा बॅकेची उमेदवारी अर्जाची रात्री उशीरा पर्यंत छाननी

Patil_p

अब असली लढाई तो मुंबई में होगी

datta jadhav

राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का ?- चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Khandekar

सिंधुदुर्ग : लॉकडाऊनचा एसटीला फटका

NIKHIL_N

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Archana Banage
error: Content is protected !!