कप ठेवला जातो उलटा
इंडोनेशियातील कॅफेत कुपी खोप नावाच्या विशेष प्रकारची कॉफी मिळते, जी ग्लास घेऊन नव्हे तर एका प्लेटमध्ये उलटवून स्ट्रॉच्या मदतीने हळूहळू प्यायली जाते. जगातील सर्वात पसंत केल्या जाणाऱया पेयांमध्ये कॉफीचा समावेश आहे. जर डोकेदुखी किंवा निराशा झटकून द्यायची असल्यास लोक कॉफीचा वापर वेगवेगळय़ा पद्धतींने करतात. याचमुळे कॉफी जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये लोकप्रिय आहे.
फेंटी कॉफी, ब्लॅक कॉफी, इन्स्टंट कॉफीबद्दल बरेच काही ऐकले असेल, परंतु कॉफीचा ग्लास सरळ न ठेवता उलटा ठेवून ती प्यायली जात असल्याचे कधीच पाहिले नसेल. एका ठिकाणी कॉफी ग्लासातून दिली जात असली तरी तो सरळ नव्हे तर उलटा ठेवून मिळते. इंडोनेनियातील कॅफे कुपी खोप नावाची विशेष कॉफी देत असतात. ही कॉफी ग्लासमध्ये नव्हे तर एका प्लेटमध्ये ओतली जाते आणि मग स्ट्रॉच्या मदतीने हळूहळू त्याची चव घेतली जाते. ही कॉफी अपसाइड-डाउन कॉफी म्हणून प्रसिद्ध आहे.
इंडोनेशियाच्या वेस्ट कोस्ट ऑफ एचमध्ये कुपी खोप कॉफी मिळते. या कॉफीचे वैशिष्टय़ म्हणजे ते सादर करण्याची स्टाइल आहे. कुपी खोप कॉफी एक कोर्सली ग्राउंड कॉफी आहे. ही कॉफी पिताना ती ग्लासमधून अनियंत्रित होत बाहेर वाहू लागू नये याची काळजी घ्यावी लागते. इंडोनेशियातील कित्येक कॅफेंमध्ये ही कॉफी सहजपणे उपलब्ध होते.
ऐतिहासिक पद्धत
अनोख्या प्रकारे कॉफी सादर करण्यासाठी हा आताचा मार्केटिंग स्टंट नसून या अनोख्या कॉफीची पद्धत अनेक शतके जुनी आहे. याला वेस्ट एच रिजन्सीची इन्टॅन्जिबल कल्चरल हेरिटेज म्हणून अधिकृत मान्यताही मिळाली आहे. एका मच्छिमाराने मासेमारीवेळी कॉफी पिण्यासाठी ही पद्धत अवलंबिली होती, कारण यात कॉफी लवकर थंड होत नाही. येथील लोकांना ग्लास न उचलता कॉफी बाहेर काढण्याचा देखील सराव झाला आहे.