मुरगाव येथील प्रा. वसंत सैल लिखित ’कोमूल’ या कादंबरीचे विमोचन आज, 24 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्त तिचा हा अल्प परिचय…
एका निम्न मध्यमवर्गीय, गरीब परंतु समाधानी, संस्कारी कुटुंबात जन्माला आलेला तरुण. काही वर्षांपासून आपल्या मनाने वरलेल्या तरुणीकडे विवाहबद्ध होतो, स्वबळावर नोकरी प्राप्त करतो आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला असतानाच त्यांचे पहिले अपत्य सेरेबल पाल्सी नावाच्या जन्मजात मेंदूच्या पक्षाघाताचा दोष घेऊनच जन्माला येते आणि तिथून सुरू होते त्यांची जीवनाची फरपट आणि परवड. छोटय़ा अपूर्वाचे संगोपन, शिक्षण, संस्कार, कौशल्य प्रदान व करता करता त्याला पदवीधर बनवून रोजगारक्षम करण्यापर्यंतचा वीस बावीस वर्षांचा अथक संघर्ष म्हणजे कोमूल कादंबरी.
म्हटलं तर आत्मचरित्र म्हटलं तर दिव्यांग संगोपनाचा एक आदर्श वस्तुपाठ. आमच्याच वाटय़ाला हे दुःख का आले आहे ? असे रडगाणे गात बसण्याऐवजी स्वतः दिव्यांग शिक्षण घेऊन दिव्यांग अपत्याचे व आपलेही मनोबल व धैर्य पराकोटीच्या नि÷sने जवळजवळ दोन तपे सांभाळत सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक इ. व्यवस्था?कडे पालकांनी दिलेली कडवी झुंज कोमूलमध्ये दृष्टीस पडते.
सेरेब्रल पाल्सी या शब्दाची फोड सेरेब्रल म्हणजे मेंदूशी संबंधित आणि पाल्सी म्हणजे अर्धांगवायू अशी होते. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायू?ची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्नायू?च्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाऱया हानीमुळे होतात.
सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. प्रसुती दरम्यान आईला झालेला संसर्ग, काही औषधांचे सेवन, गंभीर जखमा ही हा आजार होण्याची प्राथमिक कारणे असू शकतात. त्याचबरोबर मुदतीआधी जन्मलेले अपत्य, जन्माच्यावेळी अपत्याचे वजन कमी असणे, मूल उशिरा रडणे, जन्मताना झालेल्या जखमा, एकावेळी अनेक मुलांचा जन्मही सेरेब्रल पाल्सीची कारणे असू शकतात. प्राणवायूची कमतरता, कावीळ, सीझर किंवा मेंदूत पाणी जमा होणे यामुळेही सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो.
सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायू?च्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या हाताच्या तसेच पायांच्या स्नायू?मध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्टय़ा हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार रुग्णाच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम घडवतो.
सेरेब्रल पाल्सी हा आयुष्यावर कायमस्वरुपी परिणाम घडवतो. विकारात मेंदूला होणारी इजा ही कायमची असते. मेंदूला एकदा हानी झाली की ती अधिक वाढत नाही पण बरीही करता येत नाही परंतु या लक्षणांमध्ये सुधार किंवा बिघाड ही रुग्णाच्या घेतल्या जाणाऱया काळजीवर अवलंबून असते. त्यामुळे सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय हे समजून घेताना त्याची लक्षणे, त्याचे परिणाम याविषयी माहिती करून घेणे मोलाचे ठरते. यासाठी आवश्यक असतो तो मनावरील प्रचंड ताबा, नियंत्रण, उच्च कोटीची सहनशीलता व आपल्या ध्येयावर असलेला अखंड विश्वास. मुळातच दिव्यांग मुलांविषयी समाजाचे वाकडेतिकडे बोलणे, सगळीकडून येणारा नकारात्मक सूर, आपल्या सामाजिक व्यवस्था?ची दिव्यांगांप्रतीची संवेदनशीलता, सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील गलथानपणा हे सर्व अनुभवताना मनाचा निग्रह व संयम यांची फार परीक्षा लागते, हे कादंबरीतील पित्याला पाहून नक्कीच मनावर ठसते.
म्हटले तर डायरी, म्हटले तर दिव्यांगां विषयीची नियमावली, म्हटले तर दिव्यांगांविषयीच्या संगोपनाचा आराखडा, मार्गदर्शक व म्हटले तर चरित्र अशा अनेक अंगानी कोमूल आपल्यासमोर येते. प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेले असूनही कुठेही आत्मस्तुतीचा कलंक न लागता, श्री. वसंत सैल यांनी आपल्या या पहिल्याच पुस्तकातून अत्यंत साध्या, सोप्या, वर्णनपर शैलीत आपल्या जीवनानुभवाला कलात्मकतेने सादर केले आहे. दिव्यांग अपत्याच्या संगोपनाच्या क्षेत्रातील एका आगळय़ावेगळय़ा अनुभवाचे दर्शन घडवणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच अंतर्म?ख करेल.