Tarun Bharat

अमेरिकेत 5 मित्रांची अनोखी परंपरा

40 वर्षांपासून एकाच ठिकाणी भेट, एकाच पोझमध्ये छायाचित्र

लोक अनेकदा स्वतःच्या मित्रांसोबत घालविलेल्या क्षणांना साठवून ठेवण्यासाटी त्यांना छायाचित्रांमध्ये कैद करतात. अमेरिकेत 5 मित्रांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष बाब म्हणजे हे 5 मित्र 40 वर्षांपर्यंत एकाच ठिकाणी भेटून एकाच पोझमध्ये छायाचित्रे काढत राहिले आहेत. हे सत्र अद्याप सुरूच आहे.

Advertisements

जॉन डिक्सॉन, जॉन मोलोनी, मार्क रुमर, जॉन वर्डलॉ आणि डॅलस बर्नी हे हायस्कुलच्या काळापासून मित्र आहेत. हे पाचही जण 1970 पासून कॅलिफोर्निया सीमेनजीक कोप्को लेकनजीक असलेल्या केबिनमध्ये भेटत राहिले आहेत. 1982 पासून त्यांनी तेथे एका विशेष पोझमध्ये छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली आणि ही परंपरा 2022 मध्ये सुरू आहे.

आता केवळ जॉन डिक्सॉन हेच सांता बारबरा येथे राहतात, ते पेशाने शिक्षक आहेत. जॉन मोलोनी एक छायाचित्रकार असून ते न्यू ऑरलीन्समध्ये वास्तव्यास आहेत. मार्क रुमर आणि जॉन वर्डलॉ हे ऑरेगन येथे राहतात. तर डॅलस बर्नी हे कॅलिफोर्नियात शिक्षक आहेत.

या 5 मित्रांची कोप्को लेकवर एकत्र आल्यावर छायाचित्र काढून घेण्यासह आणखी एक परंपरा आहे. या परंपरेला त्यांनी टाको डिनर नाव दिले आहे. कोप्को लेकच्या काठावर असलेल्या केबिनमध्ये हे 5 मित्र मद्यपान झाल्यावर एकत्र डिनर करतात. वर्डलॉ यांच्या आजोबांनी ही केबिन तयार केली होती. पाचही मित्र या सरोवरात मिळून मासेमारीचा आनंद घेतात. या पाचही मित्रांची ही परंपरा इंटरनेटवर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे. लोक याला ‘प्रेंडशिप गोल्स’ नाव देत आहेत. ही छायाचित्रे वर्डलॉच्या कॅमेऱयाद्वारे घेण्यात आली आहेत. कॅमेराच्या सेल्फ टायमरचा वापर करत छायाचित्रे काढली जात राहिली आहेत. काही काळापासून हा ग्रूप 5 वरून 4 वर येण्याच्या वाटेवर होता. जॉन डिक्सॉन यांना कर्करोगाची लागण झाली होती. कर्करोगामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला असून आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. 2017 नंतर जॉन यांना झालेला कर्करोग आणि कोरोनामुळे हे मित्र भेटू शकले नव्हते. 15 जून रोजी त्यांनी स्वतःचे 9 वे छायाचित्र काढले. या मित्रांच्या या अनोख्या परंपरेविषयी जगाला 2017 मध्ये कळले होते. सीएनएने यासंबंधी एक वृत्त अहवाल प्रसिद्ध केला होता.

Related Stories

स्टार प्रवाहवर आता वेबसिरिजची मेजवानी

Patil_p

‘मंगलाष्टक रिटर्न’मध्ये वृषभ-शीतलची जोडी

Patil_p

रविनाची वेबसीरिज 10 डिसेंबरला ओटीटीवर

Amit Kulkarni

अनन्या अन् ईशान करत आहेत परस्परांना डेट

Patil_p

हर हर महादेव च्या टीझरसाठी राज ठाकरे यांचा दमदार आवाज

Sumit Tambekar

आयुषमान म्हणतो ट्रान्सजेंडरसोबत माझे जवळचे नाते

Patil_p
error: Content is protected !!