पोलिसांनी केली अटक, तुरुंगात जाण्याची इच्छा
चांगली जीवनशैली आणि सकारात्मक गोष्टींनी प्रेरणा घेणारे लोक दीर्घायुष्य जगतात. ऑस्ट्रेलियात 100 वर्षीय महिलेने स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीत केलेली धमाल पाहून सर्वजण अवाप् झाले आहेत.
वृद्ध महिलेने स्वतःचा 100 वा वाढदिवस अशाप्रकारे साजरा केला की पार्टीत आलेल्या पाहुण्यांना धक्काच बसला. बर्थडे पार्टी सामान्य होती, परंतु जरा हटके होती. या वृद्ध महिलेने वाढदिवशी तयार केलेली विश लिस्ट पाहून सर्वजण अचंबित झाले. शंभराव्या जन्मदिनी पोलिसांचे पथक तयांना अटक करण्यासाठी पोहोचल्यावर पार्टीतील आनंदाचा बेरंग झाला. परंतु वृद्ध महिला कुठल्याही विरोधाशिवाय आनंदाने तुरुंगात जाण्यास तयार झाल्याचे पाहून पार्टीत उपस्थित असलेले लोक चकित झाले.
वृद्ध महिला केक कापत असतानाच पोलीस त्यांना अटक करून पोलीस स्थानकात नेऊ लागले. काही मिनिटांचे गूढ अन् शांततेनुसार महिलेने आपणच पोलिसांना बोलाविल्याचे सांगितले. या कृतीमागील कारण अत्यंत चकित करणारे होते. ही वृद्ध महिला स्वतःची दीर्घकालीन इच्छा पूर्ण करण्यासाठी तुरुंगात जाऊ पाहत होती. मृत्यूपूर्वी एकदा तरी तुरुंगाची हवा खाण्याची तिची इच्छा होती. या अजब प्रकरणाचा खुलासा व्हिक्टोरिया पोलिसांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर केला आहे.
अटकेनंतर गजाआड जाण्याचा अनुभव घेण्याची माझी इच्छा होती. स्वतःची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला अटक करवून घेण्याची योजना आखली अन् पोलीस विभागानेही आनंदाने तयारी दर्शविल्याचे या महिलेने सांगितले.