वैज्ञानिकांनाही करता आली नाही रहस्याची उकल
जगात एक असे गाव आहे, जेथे 12 वर्षांपासून केवळ मुलीच जन्माला येत आहेत. म्हणजेच या वर्षांमध्ये या गावात एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. हे जाणून घेतल्यावर अजब वाटत असले तरीही हेच सत्य आहे. गावाच्या या रहस्याबद्दल वैज्ञानिक देखील अवाप् झाले आहेत. अखेर या गावात केवळ मुलीच का जन्माला येत आहेत याचा शोध त्यांनाही लावता आलेला नाही.
पोलंडमधील या रहस्यमय गावाचे नाव मिजेस्के ओद्रजेनस्की आहे. या गावात मागील 12 वर्षांमध्ये एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. येथे केवळ मुलींचाच जन्म होतो. येथील महापौराने 2019 मध्ये केलेली घोषणा चकित करणारी होती. या गावात कुठल्याही घरात मुलाचा जन्म झाल्यास त्या कुटुंबाला आपण इनाम देऊ असे त्यांनी म्हटले होते.
या गावाबद्दल समजल्यावर वैज्ञानिकांनी यामागील कारण जाणून घेण्यासाठी संशोधन केले. परंतु विस्तृत संशोधन करूनही त्यांना यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. अखेर या गावात मुलाचा जन्म का होत नाही या रहस्याची उकल त्यांना करता आलेली नाही. वैज्ञानिकच नव्हे तर पत्रकारांनी देखील या गावाचे अध्ययन केले. तरीही अद्याप या गावाचे रहस्य कायम आहे.
जगातील या अनोख्या गावाची लोकसंख्या केवळ 300 आहे. एकदा एक क्षेत्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यात गावाचे सर्व मुलींचेच होते. तेव्हापासून हे गाव चर्चेत आले. या क्षेत्राच्या महापौर क्रिस्टीना जिडजियाक यांनी मिजेस्के ओद्रजेनस्की गावाची स्थिती अजब असल्याचे म्हटले आहे. वैज्ञानिकांनी या गावात केवळ मुलीच का जन्माला येतात या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न केला असला तरीही अद्याप त्यांना यश मिळाले नसल्याचे जिडजियाक यांनी म्हटले आहे.