Tarun Bharat

एक इशारा अन् पाच दुकाने सील

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

मोळाचा ओढा परिसरात बेकायदेशीर बांधकामे व्यावसयिकांची झाली असून त्यावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करतो असा इशारा एका सामाजिक कार्यकर्त्याने देताच सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाच्या पथकाने केवळ 24 तासाची मुदत दुकानदारांना दिली तर पाच दुकानांना सील केले. ही कारवाई केल्याच्या निषेधार्थ मोळाचा ओढा रस्त्यावरील सर्व दुकानदारांनी आपली दुकानांची शटरडाऊन करत पालिकेच्या या कारवाईंचा निषेध नोंदवून आपली नाराजी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन व्यक्त केली.  

  सातारा शहरातील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोळाचा ओढा परिसरात अतिक्रमणे झाली असून त्या काढण्यात यावीत अन्यथा स्वातंत्र्यदिनाला आत्मदहन करु असा इशारा दिला. त्या इशाऱयाचे पत्र मिळताच पालिकेचे शहर विकास विभागाचे पथक शुक्रवारी सकाळी मोळाच्या ओढा परिसरात पोहोचले. त्यांनी लगेच तेथील पाच दुकानांवर सील ठोकण्याची कारवाई केली. इतर 30 ते 35 व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. नोटीस हातात पडताच सर्व व्यावसायिक अचंबित झाले. त्या नोटीसीत केवळ 24 तासाची मुदत दिली असून व्यापाऱयांनी आपली नाराजी लगेच सर्व दुकाने शटरडाऊन करुन व्यक्त केली. दुपारी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन सुरु असलेल्या कारवाईबाबत चिंता व्यक्त करत आम्ही 30 वर्षापासून त्या ठिकाणी व्यवसाय करतो आहोत. आजपर्यंत शाहुपूरी ग्रामपंचायतीचा अधिकृत कर भरत होतो. परंतु पालिकेने केलेली ही कारवाई योग्य नाही, अशी शब्दात व्यक्त केली आहे.

Related Stories

यू-19 विश्वचषक : विंडीज, पाकिस्तानची विजयी सलामी

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी टी-20 आज

Amit Kulkarni

झेक प्रजासत्ताकची क्रेसिकोव्हा ‘फ़्रेंच सम्राज्ञी’

Patil_p

हंगेरीच्या कापाससह 9जलतरणपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

बांगलादेशच्या डावात मेहमुदुल्लाचे नाबाद दीडशतक

Amit Kulkarni

मार्टिनेझच्या करारात वाढ

Patil_p
error: Content is protected !!