Tarun Bharat

पाण्याची पाईप फुटून हजारो लिटर पाणी वाया

जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोरील प्रकार

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यांच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली. मात्र हे काम करत असताना कंत्राटदार व कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणा होत आहे, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर पाण्याच्या पाईपलाच लागून खोदाई करण्यात आली. त्यामुळे पिण्याची पाईप फुटून लाखो लिटर पाणी वाया जावू लागले आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. तेव्हा तातडीने पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करण्यात येत आहे. मात्र त्याठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईप आणि केबल तोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जुन्या जि. पं. कार्यालयासमोरील पाईप फुटल्याने परिसरातील जनतेला पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अशा बेजबाबदार कामाबद्दल कंत्राटदारांना व कर्मचाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

ऍड. सचिन शिवण्णावर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Omkar B

अनमोड येथे गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

Patil_p

व्हर्सटाईल ग्रुपचे चेअरमन प्रभाकर जनवाडकर यांचे निधन

Amit Kulkarni

हमारा देश व भिमक्रांतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन

mithun mane

जवानाची गोळय़ा झाडून आत्महत्या

Amit Kulkarni

माणिकबागतर्फे बीएस-6 टिप्परचे वितरण

Patil_p