Tarun Bharat

एबी स्पोर्ट्स, टिळकवाडी क्लबची विजयी सलामी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित युजी चषक डी विभागीय बाद पद्धतीच्या वरिष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत उद्घाटना दिवशी एबी स्पोर्ट्सने रॉजर स्पोर्ट्सचा 7 गड्यांनी तर टिळकवाडी क्रिकेट क्लबने किंग्ज क्रिकेट अकादमी संघाचा 8 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. शिवलिंग सन्मानी, सोनू कुमार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

जिमखाना मैदानावर सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे जिमखाना सचिव प्रसˆा सुंठणकर व संचालक सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते यष्टीला हार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, परशराम पाटील, महांतेश देसाई, रवी पिल्ले, अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉजर्स क्रिकेट क्लब संघाने 16 षटकात सर्व बाद 73 धावा केल्या. त्यात सागरने 19, पृथ्वी पावशे 15 धावा केल्या. ए बी स्पोर्ट्सतर्फे सोनू कुमार यांनी 4 तर अरबाज जमादार याने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एबी स्पोर्ट्स संघाने 16.2 षटकात 3 बाद 74 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात कैफने 27 धावा तर सम्मेद हटेलीने 23 धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किंग्स क्रिकेट अकादमी संघाने 17 षटकात सर्वबाद 84 धावा केल्या. त्यात बसवराजने 23 धावा केल्या तर अनिल बंडीव•रने 18 धावा केल्या. टिळकवाडी क्रिकेट क्लबतर्फे शिवलिंग सन्मानी याने 4 तर ओमकार पाटीलने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी क्रिकेट क्लब संघाने 10.2 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा जमवत 8 गड्यांनी हा सामना जिंकला. त्यात दीपक बिलने 37, शिवम यादवने 23 धावा केल्या.

Related Stories

कर्नाटक : या कारणासाठी पोलिसांनी मुनावर फारुकीच्या शोला नाकारली परवानगी

Abhijeet Khandekar

हलगा शिवप्रतिष्ठानतर्फे उभारली गुढी

Patil_p

विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद एटीएम सुरू

Tousif Mujawar

एसडीएम, सीसीआय, हुबळी स्पोर्ट्स क्लब विजयी

Amit Kulkarni

संकटात असणाऱया विणकरांच्या साडय़ांची खरेदी सरकार करणार

Patil_p

पावसाचा जोर वाढला की हृदयाची धडधडही वाढतेय….

Patil_p