Tarun Bharat

कारिवडे धरणात मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

A woman died in a crocodile attack in Karivade dam

कपडे धुण्यासाठी गेलेली महिला

कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला केल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कारीवडे धरणात घडली. गुरूवारी दुपारीपेडवेवाडी येथील लक्ष्मी बाबली मेस्त्री (६०) कपडे धुण्यासाठी धरणाच्या धोबी घाटाकडे होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत म्हणून मेस्त्री कुटुंबीयांसह वाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध केली होती परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.शुक्रवारी सकाळी धरणात पाण्यात तरंगत असलेला मृतदेह कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसह गुराख्यांनी पाहिला.

या घटनेची माहिती पोलीस व वनखात्याला दिल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह
तसेच वनक्षेत्रपाल श्री क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून वन व पोलीस खात्याने घटनेचा पंचनामा केला. पोस्टमार्टम साठी मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.


यावेळी मंगेश तळवणेकर सरपंच अपर्णा तळवणेकर अशोक माळकर, बाळू माळकर आनंद तळवणेकर, पोलीस पाटील प्रदीप केळूसकर आदिसह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान मगरीच्या हल्ल्यातच या महिलेचा मृत्यू झाला. या मगरीने या महिलेच्या अंगाचा काही भाग फस्त केला होता. तसेच सकाळीही या महिलेच्या मृतदेह शेजारी मगरींचा वावर होता.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुतार कारागीर महादेव मेस्त्री यांच्या त्या मातोश्री होत.

ओटवणे प्रतिनिधी

Related Stories

खारेपाटणच्या बेपत्ता वृद्धेचा मृतदेह नदीपात्रात आढळला

NIKHIL_N

सोलापुरात आज 43 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तिघांचा बळी

Archana Banage

लोटेतील प्रदुषणामुळे दर्यासारंग मच्छीमार भोई समाज हैराण

Patil_p

चिपळुणात बेकायदा गुरे वाहतूक, चार अटकेत

Archana Banage

कणकवली बसस्थानकावरील संपकरी कर्मचारी आक्रमक

Anuja Kudatarkar

जि.प. प्रशासन लागले तयारीला

NIKHIL_N