16 वर्षांपासून सुरू आहे हा अजब प्रकार
जीवनात एकदा तरी वधूप्रमाणे नटण्याचे स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते. परंतु एक महिला 16 वर्षांपासून दर आठवडय़ाला वधूप्रमाणे नटून तयार होते. मागील 16 वर्षांपासून हीरा जीशान नावाची पाकिस्तानी महिला हा स्वतःच्या परंपरेचे पालन करत आहे. त्या दिवशी तिचे हात मेहंदीने रंगलेले असतात, दागिन्यांनी नटलेली ही महिला नव्या पेहरावात नटून तयार असते.
हीरा जीशान वधूप्रमाणे नटण्याचा स्वतःचा छंद दर आठवडय़ाला पूर्ण करते. सजण्याचा छंद प्रत्येक मुलीला असतो. परंतु कुठलीही मुलगी दररोज वधूप्रमाणे नटत नाही. पण हीरा अजब छंदामुळे दर आठवडय़ाला वधूप्रमाणे तयार होते. तिच्या या छंदामागील कारण अत्यंत रंजक आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारी 42 वर्षीय हीरा जीशान दर आठवडय़ात शुक्रवारी वधूप्रमाणे पूर्ण श्ा़ख=ंगार करते आणि नटून तयार होते. 16 वर्षांपूर्वी सुरू झालेले हे सत्र तिने कुठल्याच शुक्रवारी मोडलेले नाही. हीरा स्वतःच्या वधूच्या गेट-अपमध्ये कुठलीच कमतरता ठेवू इच्छित नाही. तिची सुंदर छायाचित्रे इन्स्टाग्राम अकौंटवर पहायला मिळतात.
16-17 वर्षांपूर्वी तिची आई अत्यंत आजारी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. डोळे मिटण्यापूर्वी मुलीचा विवाह करविण्याची त्यांची इच्छा होती. अशा स्थितीत हीराचा विवाह रुग्णालयातच आईसाठी रक्तदान करणाऱया व्यक्तीसोबत झाला होता. आईच्या आनंदासाठी हीराने तेथेच विवाह केला होता. परंतु यावेळी तिला नटता आले नव्हते. त्यानंतर हीराच्या आईचा आणि हीरायच 2 मुलांचाही मृत्यू झाला. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तिने स्वतःला वधूप्रमाणे नटविण्यास सुरुवात केली आहे.