Tarun Bharat

कार – दुचाकी अपघातात युवक – युवती जखमी

Advertisements

A young man and a young woman were injured in a car-two-wheeler accident

कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीला नांदगावच्या दिशेने चुकीच्या ‘लेन’वरून जात असलेल्या वॅगनर कारची धडक बसली. अपघातात दुचाकीवरील दोघेऊही जखमी झाले. दुचाकीवर २० वर्षीय युवक – युवती होते. युवक वैभववाडी येथील तर युवती कुडाळ येथील आहे. हा अपघात येथील जानवली पुलापुढील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी १.१५ वा . सुमारास घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचे तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले होते. अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस नाईक पांडूरंग पाढरे आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

कणकवली : वार्ताहर

Related Stories

कोरोना मृतदेह देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी होणार रद्द

Archana Banage

‘त्या’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथना फटकारलं

Archana Banage

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या, गुन्हा दाखल

Archana Banage

भारतात मिळालेल्या कोरोनाच्या स्ट्रेनचे WHO ने केले नामकरण; दिले ‘हे’ नाव

Tousif Mujawar

लॉकडाऊन उल्लंघनप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक

datta jadhav

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!