Tarun Bharat

फोटोग्राफी करताना पन्हाळगडाच्या सज्जाकोटीवरून तरुण दरीत पडला

कोल्हापूर : चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जाकोटीवरून एक तरुण दरीत पडल्याची घटना रात्री 9.15 च्या सुमारास घडली. नागेश खोबरे (वय 19 रा. कराड) असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी नागेश आला होता. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा मावळ्याच्या वेशात असल्याने तो फोटोग्राफीसाठी सज्जाकोटीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.   

Related Stories

साहेब पैसे आमच्याच हातात पडूदेत…

Archana Banage

जवाहरनगरमधील रस्ता अतिक्रमणाने बंद रहिवाशी त्रस्त

Archana Banage

ग्रामपंचायतीचे राजकारण वेगळ्या वळणावर

Archana Banage

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली ; रात्रीपर्यंत धोका पातळी गाठण्याची शक्यता

Archana Banage

कोल्हापूर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारासाठी मिळेना निधी

Archana Banage

कोल्हापूर : डीकेटीई मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड

Archana Banage