Tarun Bharat

पायी चालत केरळचा युवक निघाला हाज यात्रेला

पाच देशांमधून 8640 मैल अंतर 280 दिवसांत कापणार, युवकाचे गोव्यात स्वागत

प्रतिनिधी /वास्को

केरळच्या मलप्पुरम ते मक्का मदिनापर्यंत 8640 हजार मैल अंतर पायी चालत हाज यात्रेसाठी बाहेर पडलेल्या शिहाब चोट्टूर या युवकाचे रविवारी गोव्यात आगमन झाले. काल सोमवारी मडगाव वेर्णा मार्गे त्याने पुढच्या प्रवासाला सुरवात केली. पुढच्या वर्षी होणाऱया हाज यात्रेत सहभागी होण्यासाठी शिहाब हा युवक 280 दिवसांत साऊदी अरेबियामधील मक्का मदिनापर्यंतचे अंतर कापणार आहे. त्याचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे.

शिहाब चोट्टूर हा युवक केरळच्या मलप्पुरम हा भागातील असून त्याने 3 जूनला या महाप्रवासाला सुरवात केली आहे. 8640 मैल अंतर हा युवक 280 दिवसांत पायी चालत कापणार असून या प्रवासासाठी त्याने पाच किनारी राज्यांतील मार्गांची निवड केलेली आहे. केरळ व कर्नाटक पार करीत शनिवारी रात्री तो कारवारपर्यंत पोहोचला. कारवारात त्याचे स्वागत झाले. रविवारी सकाळी त्याचे काणकोणात आगमन झाले. गोव्यात प्रवेश करताच पोळे येथे त्याचे स्वागत करण्यात आले. सोमवारी दुपारपर्यंत व्हाया मडगाव तो वेर्णात दाखल झाला. वेर्णातील मस्जीदीच्या हॉलमध्ये त्याचे मुस्लीम बांधवांनी स्वागत केले. या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेऊन तो आगशीमार्गे पुढच्या प्रवासाला निघाला. ठिकठिकाणी त्याचे स्वागत करण्यात येत आहे तसेच त्याला सोबतही मिळत आहे. केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र व गुजरात अशा राज्यातील मार्गाने त्याचा पायी प्रवास सुरू आहे. गुजरात राज्यातून तो वाघा सिमा पार करून पाकिस्तानात प्रवेश करेल. त्यानंतर इराण, इराक व कुवेत या देशांचा प्रवास करीत तो साऊदी अरेबियामध्ये प्रवेश करेल व 2023 मध्ये साधारण वर्षभरात मक्का मदिना येथील हाज उत्सवात सहभागी होईल.

Related Stories

सत्तरीत पुन्हा पावसाचा जोर वाढला

Omkar B

भर समुद्रातील प्रदुषणकारी कोळसा हाताळणी रोखा

Amit Kulkarni

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Abhijeet Khandekar

जलवाहिनीसाठी खोदरलेला चर वाहनांसाठी धोकादायक

Omkar B

दोनापावला जेटीमुळे पर्यटनाला वेगळा आयाम मिळेल : खंवटे

Patil_p

देवी लईराईच्या सोवळे व्रताला धोंडगणांकडून प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!