A young man from Sangeli died due to lightning
परतीच्या पावसात विजेच्या कडकडासह आज पहाटे सह्याद्री पट्ट्यातील सांगेली गुरगुट वाडी येथील 29 वर्षीय तरुण हनुमंत नाना झोरे याच्या अंगावर आज पहाटे 5.30 वा सुमार अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाला .या भागात आज पहाटेपासूनच विजेच्या कडकडासह पाऊस सुरू झाला होता श्री झोरे लघुशंकेसाठी घराच्या अंगणात गेला असता अचानक त्याच्या अंगावर विजेचा लोळ पडून तो जागेच खाली पडला तो घरात पुन्हा परतला नाही . म्हणून त्याच्या घरातील आई-वडिलांनी पण कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहतात तर तो अंगणात विजेचा लोळ पडून पडला होता लागलीच गावातील व्यक्तींनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कळवतात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसि फ सय्यद व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला होता तो अविवाहित होता शेतीची कामे व मेंढ्या पालन हा त्याचा व्यवसाय होता सावंतवाडी तालुक्यात भरतीच्या पावसाने वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही या कुटुंबाचे विचारपूस केली.
सावंतवाडी / प्रतिनिधी