इचलकरंजी/प्रतिनिधी
ढोणेवाडीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा केला. यामध्ये त्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दादासो जिवबा बेनाडे ( वय २४ , रा. ढोणेवाडी ता. निपाणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.
मृत दादासो बेनाडे यांने गुरुवारी दुपारी शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.