Tarun Bharat

युवकाकडून आजीचा डोक्यात दगड घालून खून

Advertisements

फलटण शहरात उडाली खळबळ

प्रतिनिधी/ सातारा

कौटुंबिक वादातून नातवाने आजीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना फलटण येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली.  

मंगल बबन शिंदे (अंदाजे वय 65 ठाकुरकी ता. फलटण) या सायंकाळी फलटण येथील विमानतळ परिसरात शेळ्या चारण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचा नातू आकाश सुखदेव शिंदे (वय 25, फलटण) हा सायंकाळी आला. त्याचा आजी मंगल यांच्याशी कौटुंबिक वाद झाला. याचे रुपांतर मारामारीत झाले, आकाशने त्याठिकाणी पडलेला मोठा दगड उचलून आजीच्या डोक्यात मारला. यावेळी त्या जमिनीवर रक्तबंबाळ होऊन पडल्या होत्या. शेजारीच सैन्यभरती प्रशिक्षण करीता आलेल्या युवकांनी व फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पळून जाणाऱया आकाशचा पाठलाग केला. नंतर तो स्वतः शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.  

 घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनस्थळाला भेट दिली. पुढील तपासाच्या सूचना दिल्या असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. 

Related Stories

बाधितवाढ चारशे-पाचशेवर स्थिर

datta jadhav

सातारा : शिवडे (उंब्रज) येथील एस. के. पेट्रोल पंपावर सहा जणांचा सशस्त्र दरोडा

Abhijeet Shinde

पिंपळवाडी येथे युवकाचा खून

datta jadhav

सातारा : पसरणी घाटात खाजगी बसचा अपघात

Abhijeet Shinde

जिल्ह्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Abhijeet Shinde

दरडग्रस्तांचे पुनर्वसन जलसंपदाच्या क्वार्टर्समध्ये

Patil_p
error: Content is protected !!