सीसीबी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
मार्केट यार्ड परिसरात गांजा विकणाऱया एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सीसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 1 किलो 3 ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला आहे.
वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी गणेश राजू टिटंबी (वय 21) रा. खासबाग याला गांजा विकताना अटक केली आहे. त्याच्याजवळून गांजासह एक मोबाईल फोनही जप्त केला आहे.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एच. एस. निसण्णावर, एस. बी. पाटील, एम. एम. वडेयर, एस. एम. बजंत्री, वाय. डी. नदाफ आदींनी भाग घेतला होता. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे.