Tarun Bharat

पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यात युवक बुडाला

Advertisements

शाहुवाडी/प्रतिनिधी

पालेश्वर ता. शाहुवाडी येथील धरणाच्या सांडव्यातून पडत असलेल्या पाण्यात लाटवडे ता. हातकणंगले येथील राजेश बाबुराव पाटील (वय ३५)  हा युवक बुडाल्याची माहिती शाहुवाडी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, त्याचा शोध अद्याप लागला नसून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जीवनरक्षक रेस्क्यू टीम त्याचा शोध घेत आहे. तर घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळपे यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

लाटवडे ता. हातकणंगले येथील राजेश पाटील हे आपल्या मित्रांच्या समवेत १५ ऑगस्ट रोजी आले होते. पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून पडत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी ते धबधबा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी ते सांडव्यातून पडत असलेल्या पाण्यात बुडाले. यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र अंधार पडल्यानंतर शोध मोहीम  थांबवण्यात आली. यानंतर मंगळवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जीवन रक्षक रेस्क्यू फोर्स जिल्हा व्यवस्थापक अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कांबळे, राज मोरे, शुभम काटकर ‘रोहित जाधव, सोमनाथ सुतार, आकाश लोकरे, जीवन कुबडे हे स्कूबा ड्राईवच्या माध्यमातून शोध मोहीम राबवत आहेत. या घटनेची फिर्याद विकास माळी यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे.

घटनास्थळी मंडल अधिकारी संदेश कदम, पोलीस पाटील सुशीला कांबळे, कुमार पाटील यांच्यासह स्थानिक युवक नागरिक ही शोध मोहीम स्थळी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने गांभीर्य घेतले पाहिजे

Abhijeet Shinde

सातारा : राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला कामकाजाचा आढावा

Abhijeet Shinde

गगनबावडा तालुक्यात आढळले 12 कोरोना बाधित

Abhijeet Shinde

पंचगंगा प्रदुषण मुक्तीसाठी खासदार मानेंचे पाऊल प्रोसेसर्स असोशिएनची बैठक

Abhijeet Shinde

वारणा समूह परिसरात सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना अभिवादन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ट्रॉमा केअर’ 5 महिन्यांनंतर सोमवारी सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!