Tarun Bharat

“हम यहा के भाई है!”, दहशत माजवण्यासाठी टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पुण्यात धनकवडी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. एका टोळक्याने दहशत माजवण्यासाठी एटीएममधून पैसे काढणाऱ्या एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी आरोपींनी “हम यहा के भाई है” असे म्हणत कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. चव्हाणनगर परिसरात ही घटना घडली.

शिवशंकर थोरात (वय 27, रा. धनकवडी, पुणे) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. थोरात याने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरात याच्यावर हल्ला करुन तिघेजण पसार झाले आहेत.

अधिक वाचा : संघर्षालाही मर्यादा असावी; पवारांनी दसरा मेळाव्यावरुन टोचले दोन्ही गटाचे कान

मिळालेल्या माहितीनुसार, थोरात रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास चव्हाणनगरमधील निर्मल पार्क इमारतीत असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला होता. एटीएम केंद्रातून पैसे काढून तो बाहेर पडला. त्या वेळी तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत थोरात गंभीर जखमी झाला. यावेळी तिघांनी “हम यहा के भाई है”असे म्हणत कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. थोरात याच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर पूर्व वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा संशय सध्या पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.

Related Stories

बेळगाव जिह्यात दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

Tousif Mujawar

तळई दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा

Archana Banage

10 वी-12 वी च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

datta jadhav

तिरंगा उलटा फडकावल्याप्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

OBC RESERVATION : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर

Archana Banage

चिपळुणात विवाहितेसह दोघांची आत्महत्या

Archana Banage
error: Content is protected !!