तीन वर्षीय मुलीसह अन्य दोघे गंभीर
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा-कळंगुट मार्गावर बोडगेश्वर मंदिरानजिक मंगळवारी रात्री 11.30 वा. झालेल्या समोरासमोरील भीषण अपघातात एका 28 वर्षीय तऊणाचा जागीच मृत्यू झाला. इतर तिघे गंभीररित्या जखमी झाले असून त्यात 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. सद्दाम मोहम्मद (28, वेर्ला-काणका, मूळ झारखंड) असे मृताचे नाव आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सद्दाम हा जीए 03 एफ 3147 या दुचाकीवरुन काणकाहून म्हापशाकडे येत होता. संशयित उमर फाऊक खान (19, एकता नगर- म्हापसा) याच्या जीए 03 एक्मयू 1886 या बुलेट मोटारसायकलची त्याला धडक बसली. उमर फाऊक खानने निष्काळजीपणे आणि अती वेगाने मोटारसायकल चालवल्याने हा अपघात घडला. सद्दाम यांच्या दुचाकीवर जैद खान (13) आणि हिदया खान (3) हे दोघे होते. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हिदया ही सद्दाम यांची मुलगी आहे. संशयित उमर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने इस्पितळात नेले. म्हापसा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर सांडलेले रक्त धुवून रस्ता साफ केला. निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब व हवालदार समीर नाईक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत