दुर्दैवी युवकाच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत : जिल्हाधिकाऱयांचे आदेश
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील चुंचवाड येथे घराची भिंत पडून युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव अनंतराज धर्मेंद्र पाशेट्टी (वय 16) असे आहे.
सदर युवक रात्री गोठय़ात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला होता. अचानकपणे गोठय़ाची भिंत अंगावर कोसळल्याने ढिगाऱयाखाली सापडून युवक जागीच ठार झाला. गुरुवारी रात्रीपासून तालुक्मयात वारा व जोराचा पाऊस सुरू आहे. गोठय़ाच्या बाजूला असलेली भिंत कोसळल्याने एकच आवाज झाला. त्यावेळी कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली असता अनंतराज ढिगाऱयाखाली सापडल्याचे लक्षात येताच त्याला बाहेर काढण्यात आले. पण तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती नंदगड पोलीस स्थानकाला कळताच पोलिसांनी घटनेची नोंद केली व खानापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मृताच्या पालकांना तातडीने नुकसानभरपाई
खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी चुंचवाडला भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. निंबाळकर यांनी तातडीने तालुका प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी नितेश पाटील त्यांच्याशी संपर्क साधून मदत देण्याची विनंती केली. यानंतर जिल्हाधिकाऱयांनी आरटीजीएसमार्फत दुर्दैवी युवकाचे वडील धर्मेंद्र पाशेट्टी यांच्या बँक खात्यावर 5 लाखाचा मदत निधी जमा करण्याचे आदेश दिले. तहसीलदार प्रवीण जैन यांनी सदर निधी खात्यावर जमा झाल्याचे पत्र सुपूर्द केले. दुर्घटनेनंतर केवळ काही तासात अहवाल मिळवून मृत मुलाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देऊन जिल्हा प्रशासनाने आपल्या संवेदना दाखवून दिल्या. यावेळी आमदार अंजली निंबाळकर उपस्थित होत्या.
अनंतराज याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. आनंद हा त्यांचा एकुलता मुलगा असल्याने गाव व परिसरात एकच शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.