रायबाग पोलिसांची कारवाई, 10 दुचाकी जप्त
बेळगावः मोटारसायकली चोरणाऱया एका युवकाला रायबाग पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरीच्या 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी ही माहिती दिली आहे.
निंगाप्पा उद्दाप्पा पिडाई (वय 30, रा. देवापूरहट्टी, ता. रायबाग) असे त्याचे नाव आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. रायबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.