Tarun Bharat

खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले; आदित्य ठाकरे

Advertisements

महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालयं. अधिवेशनाआधीचं विरोधीपक्ष राज्य सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. विधानभवनाच्या पायरीवरचं सरकार विरोधात घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तसेच खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्येआदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते.

एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करताना ते म्हणाले, खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय. शिंदे गटात निष्ठेला कुठेही स्थान नाही. सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही.ज्यांना सर्व दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. तिथे जाऊन आमदार फसलेले आहेत. अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत.जर यायचे तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मी काही राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना याचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून, महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली. जनतेला धमकावणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील, तर यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो असंही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीत, राजकारणात याआधी गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?,” अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

Related Stories

सातारा जिल्ह्यात सरासरी 518.13 मि.मी. पावसाची नोंद

Abhijeet Shinde

प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र

prashant_c

किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी सुरु ठेवण्याचा विचार – राजेश टोपे

Abhijeet Shinde

300 कोटींच्या बिटकॉईनसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, पोलीस शिपायासह 8 जणांना बेड्य़ा

datta jadhav

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर

Abhijeet Shinde

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!